जागतिक स्तरावरील आर्थिक सेवा बाजारपेठेत भारत एक महत्वाचे केंद्र बनू शकते : धर्मेंद्र प्रधान
बॅंकिंग, फ़ायनान्स आणि इन्श्युरन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार
एआयसीटीई(AICTE),एनएसडीसी( NSDC) आणि बजाज फ़िन्सर्व यांच्यात भागीदारी
मुंबई 14 डिसेंबर, 2023 : एनएसडीसी (NSDC) आणि बजाज फ़िन्सर्व तसेच एआयसीटीई (AICTE) आणि बजाज फ़िन्सर्वमध्ये दोन एमओयु वरती भारताचा शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे केंद्र मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि ,कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सचिव, अतुल कुमार तिवारी, तसेच एआयसीटीई (AICTE) चे सदस्य सचिव , प्राध्यापक राजीव कुमार आणि एनएसडीसी (NSDC) चे सीईओ आणि, एनएसडीसी (NSDC) इंटरनॅशनलचे महाव्यवस्थापक असलेले वेद मणी तिवारी तसेच बजाज फ़िन्सर्वचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक असलेले संजीव बजाज यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या कार्यक्रमाला क्रुष इराणी, प्रेसिडन्ट ग्रुप-सीएसआर आणि पल्लवी गंधालीकर नॅशनल हेड-बजाज फ़िन्सर्व सीएसआर देखील उपस्थित होते.
देशातील प्रमुख कौशल्य विकासाचे स्त्रोत असलेल्या एआयसीटीई(AICTE, शिक्षण मंत्रालय अंतर्गत) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC,कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयांतर्गत) ,द्वारे भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण अशा आर्थिक सेवा समूह असलेल्या,बजाज फ़िन्सर्व लिमिटेडसह एकत्र येऊन पदवीधर तरूणांना आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बजाज फ़िन्सर्व लिमिटेड, चे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक, संजीव बजाज म्हणाले, “ आमची एनएसडीसी( NSDC) आणि शिक्षण मंत्रालयाशी झालेली भागीदारी ही आम्हाला तरूण वर्गामध्ये बदल घडवून आणण्यात मदत करेल ज्याकरिता त्यांना उत्तम कौशल्यासह अगिणित असे यशाचे दरवाजे देखील खुले होतील. यामुळे आर्थिक लवचिकतेस एकत्रित कामाचा संधी भविष्यात उपलब्ध होतील, आणि कौशल भारत, कुशल भारत हे वाक्य खरे करून दाखविले जाईल.”
बजाज फ़िन्सर्वचा भागीदारीमुळे, बॅंकिंग, फ़ायनान्स आणि इन्स्युरन्स सर्टिफ़िकेट प्रोग्राम (CPBFI) कौशल्य विकासाचा, 100- तासांचा एक अभ्यासक्रम विकसित केला आहे ज्याच्या माध्यमातून 20,000 उमेदवार तयार केले जातील , या अभ्यासक्रमाची निर्मीती ही उद्योग तज्ञ, प्रशिक्षण भागीदार, शैक्षणिक संस्था आणि मानसशास्त्रीय आरोग्य संस्थांचा मदतीने करण्यात आलेली आहे. CPBFI सध्या सुमारे 350 + महाविद्यालयात 23 राज्य, 100 जिल्हे आणि 160+ गावांमधून कार्यरत आहे. यांचा हेतू हा कौशल्य, शिक्षण आणि तरूण पदवीधर आणि एमबीएचा विद्यार्थ्यांमध्ये नेमका आत्मविश्वास निर्माण करण्याचा आहे, विशेषत: 2 आणि 3 टियर शहरांमध्ये. असे केल्याने रोजगार क्षमता निर्माण होत असतानाच आर्थिक सेवा क्षेत्रामध्ये दीर्घकालीन कामाचा टिकावा लागावा म्हणून योग्य ते निर्णय देखील ते घेऊ शकतील.
No comments:
Post a Comment