Tuesday, 19 December 2023

नेरुळ येथील इमारतींची मुदत संपुष्टात आल्याने महानगरपालिकेची नियमानुसार कार्यवाही

 नेरुळ येथील इमारतींची मुदत संपुष्टात आल्याने

महानगरपालिकेची नियमानुसार कार्यवाही

मंत्री उदय सामंत

            नागपूरदि. 19 :  नेरुळ (नवी मुंबई) येथील महानगरपालिका क्षेत्रातील भूखंडावर बांधण्यात आलेल्या त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या इमारती रिकाम्या करण्यास रहिवाश्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्याने महानगरपालिकेने यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही सुरू केल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य रवींद्र वायकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

            मंत्री श्री. सामंत यांनी लेखी उत्तरात सांगितले कीनेरूळ (नवी मुंबई) येथील महानगरपालिका क्षेत्रातील भूखंडावर त्रिमूर्ती कॉम्लेक्स व कृष्णा कॉम्प्लेक्स अशा दोन अनधिकृत इमारती उभारल्या असूनया इमारतींचा अनधिकृतपणे रहिवाशी वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

            या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विकासकास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमनुसार नोटीस देण्यात आली होती. तथापिया इमारतीमधील रहिवाश्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असताप्रथमतः उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरूध्द या इमारतींमधील रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असतासर्वोच्च न्यायालयाने या इमारती रिकाम्या करण्यास सहा महिन्यांची मुदत देऊन याचिका निकालात काढली. ही मुदत संपल्याने महानगरपालिकेने नियमानुसार कार्यवाही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi