Thursday, 14 December 2023

मागेल त्याला शेततळे' योजना अधिक व्यापक करणार

 मागेल त्याला शेततळेयोजना अधिक व्यापक करणार

                                      - मंत्री धनंजय मुंडे

 

            नागपूरदि. 14 : मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असूनअवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावायादृष्टीने विदर्भमराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. 

            'मागेल त्याला शेततळेयोजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

            शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असलातरी ती राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतोत्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईलअसेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले. 

            कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या-थोड्या अंतरावर बदलतेत्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईलअसेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. 

            यावेळी सदस्य बाळासाहेब थोरातबबनराव लोणीकरप्रकाश सोळंकेनाना पटोलेॲड. आशिष शेलारबबनराव लोणीकर आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi