Tuesday, 19 December 2023

गणेश मूर्तिकारांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील

 गणेश मूर्तिकारांच्या रोजगारावर परिणाम

होणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील

-  मंत्री दीपक केसरकर

            नागपूर, दि. 18 : पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची निर्मिती करताना मूर्तिकार, कलाकार यांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील राहिलअसे मंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य जयंत पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सर्वश्री प्रवीण दरेकर, अनिकेत तटकरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, गणेश विसर्जनसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात असून पाण्यावर प्रक्रिया करून देण्यात येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तयार करणेविक्री करणे यास प्रतिबंध आहे. पर्यावरण पूरक गणेश मूर्तींना प्रोत्साहन देत असताना या व्यवसायातील कामगारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांचे व्यवसाय निसर्गाला पूरक होतीलयासाठी प्रयत्नशील असल्याचेही मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, राज्यातील प्रदुषण टाळण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पर्यावरण विषयक विविध कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी व्यापक जनहितार्थ असून त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महानगरपालिका हद्दीतील घरगुती गणपती पर्यावरण पूरक असतील व याबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावीयासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

000000

राजू धोत्रे/विसंअ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi