एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
सन 2023-24
शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गतच फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते.फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे. फलोत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधाबाबत विशेष लेख...
काढणीत्तोर व्यवस्थापन
फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादन, औषधी , सुगंधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजार मुल्य शेतकऱ्यांना कमी मिळते या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी इ. प्रकल्पांना प्रेात्साहन व अर्थसहाय्य दिले जाते.
No comments:
Post a Comment