*एक दिवा लावावा...*
*एक दिवा लावावा अंगणात*
*विद्रोहाचा...*
*त्यात असावा जळता कापूस*
*संघर्षाचा...*
*असावा घट्ट आवर त्याला*
*एकतेचा...*
*गोड धोड करावा*
*मुखात पक्वान शब्दांचा...*
*धमाका व्हावा, फटाक्यांचा नव्हे*
*इथल्या व्यवस्थेचा...*
*झगमग व्हावा लाइटिंगचा नव्हे*
*आदर्श विचारांचा...*
*सजले जावे अंगण जीवनाचे*
*इतिहासाच्या रांगोळीने...*
*मनावर चढले जावे*
*तोरण प्रत्येक त्यागाचे...*
*पुष्पहार असावे आणिक्*
*महापुरुषांच्या अमर कार्यांचे*
*तोडले जावे दरवाजे*
*गुलामीच्या दाराचे...*
*तेव्हाच होईल रक्षण लेका*
*तुझ्या माझ्या घराचे...*
*तू पेटव फुलबाजा हा*
*शोषण थांबेल पिसणाऱ्या देहाचा*
*म्हणून एक दिवा लावावा अंगणात*
*विद्रोहाचा...*
*दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा ...................*
*लक्षवेधी मास मीडिया प्राय ली.
No comments:
Post a Comment