Wednesday, 29 November 2023

बालधोरणाची माहिती लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी

 बालधोरणाची माहिती लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबई, दि. 28 : राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करीत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.

           मंत्रालयातील दालनात बालधोरणाच्या मसुदाच्या सादरीकरणावेळी सूचना करताना मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेसह आयुक्त राहुल मोरे यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, बालधोरणात बालकांच्या अनुषंगाने काम करणाऱ्या सर्व विभागांना याबाबतची माहिती पाठविण्यात यावी. संकेस्थळावरील प्रसिद्ध केल्यानंतर विभागाने यामध्ये जनतेकडून आलेल्या सूचनांचा व हरकतींवरही तातडीने कार्यवाही करावी. बालकांचा आहारसुरक्षितता, शिक्षण व आरोग्यहक्क, ग्रामीण व शहरी भागातील बालके यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक समाज घटकातील बालके आणि सर्व संस्था यांची देखील मते विचारात घ्यावी. या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi