Thursday, 30 November 2023

पणन विभागाच्या विविध विकास कामांचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

 पणन विभागाच्या विविध विकास कामांचा

मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

 

            मुंबई, दि. 29 : कोकणात काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र उभारणे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्याबाबतच्या प्रस्तावाचा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा घेतला.

             यावेळी पणन संचालक केदारी जाधव, व्यवस्थापकीय संचालक संजय कदम व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. सत्तार म्हणाले कीकोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. विद्यापीठाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त करून घेण्याची कार्यवाही पणन मंडळाकडून करण्यात येत आहे.

                कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ज्या ठिकाणी शेतकरी भवन नाही तेथे शेतकरी बांधवांना निवासासोबतच व मुक्कामाच्या ठिकाणी शेतीशी निगडित सर्व साहित्य व बहुआयामी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. राज्यात एकूण 306 कृषी उत्पन्न बाजार समिती असून शेतकरी भवन नसलेल्या 116 बाजार समितीमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी बाजार समित्यांना शासन अनुदान देणे प्रस्तावित असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi