*देवीची ओटी*
आज एक मुलगी ठाणे स्टेशन ला ५ रू मीटर नी ताजेतवाने तोरण विकत होती...*
बाजूचे सगळे २०/३० रू ला विकत होते,
मी तीला विचारलं,
*सगळे २०/30 रूपयांनी विकत आहेत, तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे म्हणून पाच रुपयांनी विकतेस का..?*
ती थोडं थांबली व मला म्हणाली...
दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुल ..बाप नाही आई निघून गेली.. आजी सांभाळते मला
सकाळी ₹१००/- दिले आजीने डाळ तांदूळ आणायला...
विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं...
म्हणून ट्रेन पकडून ठाण्यात आले दुपारी ३ वा फुल दोरा सुई विकत घेतली ₹८०/- खर्च झाले ...
पहिले मी पण विस रुपयांना विकले,
*आजीने दिलेल्या १००/- रुपयाचे ३००/- रुपये केले. आता उरलेले पाच तोरण विकले, तर ठिक नाहीतर, घराला बांधीन पहिली कमाई म्हणून...*
मी शांत पणे खिश्यात हात घालता १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हंटले पोरी हे पैसे ठेव , मला तोरण नको माझ्या कडून तुला तुझ्या मेहनतीचे गिफ्ट , घरी जा ह्यातील एक तोरण तू दरवाज्याला लाव आणि हो हे घे अजून ५० रुपये, जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा...
कालंच बायको म्हणत होती...
*देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू...*
आज तिची इच्छा पूर्ण झाली.
No comments:
Post a Comment