Thursday, 30 November 2023

घडी मोडणे*.. साडी ची छान परंपरा

 *घडी मोडणे*..

  *पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या*..

    *किती प्रेमळ रिवाज होता* ना तो.. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा..वर्षाला एखाद - दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची फार तर मजल असायची..त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली *नवी-कोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल*.. 

    *नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची...* त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं..तिला *कान-कोंडं* वाटू नाही म्हणून...*, "तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात"* असंही वरून म्हणायचं..आणि *गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा*....🥰🥰🥰🥰

      *मनांच्या श्रीमंतीचा काळ होता तो!* 🌹🙏✔️💯🌹🙏

   🙏🏻🌸


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi