Sunday, 5 November 2023

युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार

 

 युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी : सुधीर मुनगंटीवार

  • नशामुक्त समाज निर्मितीसाठी राज्य शासनाच्या सर्वतोपरी सहाय्याची ग्वाही

 

ठाणेदि. ४ नोव्हेंबर २०२३ (जिमाका) : 

 

आचार्य श्री महाश्रमणजी व अनुव्रत विश्वभारती सोसायटीने सुरू केलेल्या नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानात राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअसे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. युवकांसह समाजाला केवळ देशभक्ती व समाजसेवेची नशा असावी असेही ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

       अनुव्रत विश्वभारती सोसायटीच्या वतीने ठाण्यात आयोजित 'से यस टू लाईफ नो टू ड्रग्जया नशामुक्ती राष्ट्रीय परिषदेत श्री. मुनगंटीवार बोलत होते. 

 

    यावेळी आचार्य श्री महाश्रमणजीडॉ. गौतम भन्सालीमीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडेअंमली पदार्थ विरोधी पथकाचे संजय कुमारनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे सचिन जैनडॉ. एस व्ही खानीलकरलेखकदिग्दर्शक मनोज मुंतशीरजितो चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल कवाडसी जी डांगीयांच्यासह विविध मान्यवरएनसीसी व एनएसएसचे विद्यार्थीपोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक अशोक कोठारी यांनी प्रास्ताविक केले.

 

      श्री. मुनगंटीवार म्हणाले कीभारत देश हा संस्कारी देश आहेया देशात सेवा व त्यागाची पूजा होते. आपल्या देशात आपल्या मनाला जिंकणारा सम्राट होतो. पण आज नशेमुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नशामुक्ती अभियान राबविणे आवश्यक आहे. या कामासाठी आपल्याला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. 

 

नशामुक्ती ची सुरुवात माझ्या जिल्ह्यातून  केली. 2014 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. ज्या व्यसनाने आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते ते फक्त अश्रू नसून ते तुम्हाला पापी बनविणारे मार्ग आहे. *युवकांना केवळ देशभक्तीचीसमाज सेवेचीनशा असायला हवी.*

 

      समाजात नशामुक्ती करताना अनेक प्रश्न निर्माण होतात. हे अडथळे दूर करून नशामुक्त समाजासाठी एकत्र येऊन काम करू. आचार्य महाश्रमनजी यांच्या नशामुक्ती मिशनसाठी सर्वशक्तिनिशी राज्य शासन पाठीशी राहील. हे मिशन सज्जन शक्तीचे आहेहे मिशन देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या भाविकांचे आहेअसेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

   

यावेळी श्री. पांडेश्री. भन्साली यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi