Friday, 3 November 2023

रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी

 रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी

कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 1 : रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामांना गती देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

              रायगड जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कार्यान्वित करण्याबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी रायगडचे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवेरोहाचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकमउपवनसंरक्षक (ठाणे) अक्षय गजभियेरोहाचे सहायक वनसंरक्षक  विश्वजित जाधवअलिबागच्या उपवनसंरक्षक  गायत्री पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. बी. कदम आदी उपस्थित होते.

              मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीरायगड जिल्ह्यात पनवेलपेणकर्जतखालापूरउरणअलिबागसुधागडमाणगावरोहामुरुडश्रीवर्धनम्हसळामहाडपोलादपूरतळा या तालुक्यातील संपर्कासाठी मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडविण्यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन तातडीने पूर्ण कराव्यात. कालबद्ध कार्यक्रम तयार करुन प्रशासनाने ही कामे गतीने करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या. रायगड जिल्ह्यात आपत्कालिन स्थितीत टिकणारी अद्ययावत अशी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi