हिमालय, सह्याद्रीच्या आधीच्या काळात जायचंय?
- चला कच्छला, जीवाश्म गोळा करायला
ही गोष्ट फार जुनी आहे, काही कोटी वर्षांपूर्वीची. अजून हिमालय निर्माण व्हायचा होता, आपल्या सह्याद्रीने सुद्धा आकार घेतला नव्हता. गुजरातमधील कच्छच्या परिसरात समुद्र पसरला होता. प्रवाळांच्या (corals) वसाहती, असंख्य समुद्री जीव- शंख, शिंपले, कवड्या, ऑयस्टर, त्यांचे असंख्य प्रकार... आश्चर्यचकित व्हावे इतकी सारी विविधता.
किमान काही कोटी वर्षांचा हा कालखंड. मग हवामान बदलते, भूगर्भात हालचाली होतात. त्यानुसार गोष्टी बदलतात, जीवसुद्धा बदलतात. मात्र, पृथ्वीचा आणि त्यावरील जीवांचा हा संपूर्ण इतिहास नोंदवला जातो. ते साधन असते- जीवाश्म अर्थात फॉसिल्स!
पृथ्वीचा हा इतिहास सांगणारी जीवाश्म पाहण्याची, त्यांचा अर्थ शोधण्याची व गोळा करण्याची संधी "भवताल" तर्फे जानेवारी महिन्यात मिळणार आहे. याचबरोरब कच्छच्या रणाचा अनुभव, ऐतिहासिक लखपत किल्ल्याला भेट...
पहिली बॅच भरल्याने ही दुसरी बॅचची घोषणा. रेल्वे बुकिंग संपत असल्याने लवकर नोंदणीचे आवाहन.
नावनोंदणीसाठी लिंक:
संपर्क:
9545350862 / 9922063621
- भवताल टीम
No comments:
Post a Comment