Thursday, 26 October 2023

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक - मंत्री सुधीर मुनगंटीवार

 मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 25 : मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्रयाबाबत इतर विभागांशी निगडित बाबींचा विचार करावा लागेल. त्यासंदर्भात निश्चितपणे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईलअसे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यासंदर्भातील मागणी संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. आमदार प्रवीण दरेकरआमदार महेश बालदीमत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणेउप सचिव (मत्स्य) कि. म. जकातेसहआयुक्त (मत्स्य - सागरी) महेश देवरेरवींद्र वायडामहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य अभियंता आर.एम. गोसावी आदींची यावेळी उपस्थिती होती.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीमत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाला तर निश्चितपणे मच्छ‍िमार बांधवांना शेतीसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. वीजपाणीकोल्ड स्टोरेज आदी सुविधाही त्यांना मिळू शकतील. मात्रया व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यावर आणखी काय बाबी अंतर्भूत होऊ शकतातइतर विभागांशी निगडित परवानगी त्यासाठी आवश्यक आहेत कायाचाही विचार केला जाईल. तसेचराज्य मंत्रिमंडळासमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाईलअसे त्यांनी सांगितले.

रोजगाराशी निगडित ही बाब आहे. त्याचा अनुकूल आणि सकारात्मक परिणाम यावर होईल. त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. अतिशय गांभीर्याने यावर निर्णय होईलअसे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi