Wednesday, 11 October 2023

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार

 नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती

केंद्र सरकारशी चर्चा करणार

             - सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबईदि. ११ : नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिकलहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी- सेवा उपलब्ध करून देतात.  परंतु राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आहेत.या बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठीत करावीअसे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

             मंत्रालयात नागरी सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत श्री. वळसे पाटील बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकरसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारसहकार आयुक्त अनिल कवडेमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सहकार मंत्री श्री. वळसे- पाटील म्हणालेरिझर्व्ह बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या जाचक अटी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यामुळे अनेक नागरी बँका अडचणीत येत आहेत. याबाबत सतत गाऱ्हाणी येत आहेत.

            राज्य आणि केंद्र सरकारकडून काय मदत करता येईलयाबाबत गठीत समितीने अभ्यास करून   राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. तो अहवाल केंद्र शासनाला पाठवून मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सहकार मंत्री श्री.वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi