Sunday, 17 September 2023

गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान

 गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            छत्रपती संभाजीनगरदि. 16 ): सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणि समाजातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी शासनाचे भरीव योगदान आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मागील एक वर्षात शासनाने सुमारे 112 कोटी रुपये गरजू रुग्णांच्या उपचारासाठी दिले असल्याचेमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            शहरातील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

            मुख्यमंत्री म्हणाले की,  मराठवाडयाच्या विकासासाठी 46 हजार कोटीहून अधिक विकास कामांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मराठवाड्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.  मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार मिळाले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजनेमध्ये रुपये पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आले आहे.  सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे हे शासन आहे.

            दरम्यानजालना जिल्ह्यातील अंतरवाल सराटी येथे लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या काही रुग्णांवर गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी मुख्यमंत्री यांनी जखमी रुग्णांची भेट घेऊन त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली.

            कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराडपालकमंत्री संदिपान भुमरेआमदार हरीभाऊ बागडेआमदार संजय शिरसाटआमदार प्रदीप जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi