नोबेल हजारे यांची तैवानमधील आणखी एका विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड
* पत्रकार उत्तम हजारे यांच्या मुलाचे घवघवीत यश
* एनसीएचयु विद्यापिठात निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी
बीड, दि. ३१ (लोकाशा न्यूज) : बीड येथील पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबेल उत्तम हजारे हा विदेशात शास्त्रज्ञ बनणार असून, तैवानमधील एनडीएचयु विद्यापिठानंतर तैवानमधील आणखी एका ताईचुंग येथील एनसीएचयु विद्यापिठात त्याची उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे .नोबेल हजारे यांच्या या यशाबद्दल बीड जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा विद्यार्थी असलेला नोबेल हजारे यांचे प्राथमिक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालयात झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण बलभीम महाविद्यालयात झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमएस्सी पूर्ण केल्यानंतर, पीएचडीसाठी झालेल्या पुर्व परिक्षेत नोबेल हजारे हा मुंबई विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठ व नांदेड विद्यापीठासाठी पात्र झाला होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रो. बी.एन. डोळे सर, एम. डी. सिरसाट सर ,प्रो. अनिता मुरुगकर मॅडम, मेंटार विजयकिरण नरवडे सर ,प्रो. भरत मडावी सर , प्रो. ताटे बी. टी.सर तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यानंतर, नोबेल हजारे यांची तैवान देशातील नॅशनल डाँग युनीव्हरसिटी (एनडीएचयु) विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली होती, त्यानंतर ताईचुंग येथील एनसीएचयु या नामांकित विद्यापिठात त्याची निवड झाली आहे. याबाबतचे पत्र त्यास नुकतेच प्राप्त झाले आहे.
या महिन्यात जाणार तैवानला
नोबेल हजारे यांनी विद्यापिठातील प्रवेश निश्चित केला असून, या महिन्यात पंधरा ऑगस्टनंतर तो विदेशात जाणार आहे. एनसीएचयु विद्यापिठात उच्च शिक्षणासाठी निवड झालेला नोबेल हा एकमेव भारतीय विद्यार्थी आहे .
सिरसमार्गचा नावलौकिक
सिरसमार्ग येथील भूमीपूत्र असलेले ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांच्या मुलाने शैक्षणीक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केले असून, सिरसमार्गचा नावलौकिक वाढवला आहे, सिरसमार्ग व परिसरातुन विदेशात शिक्षणासाठी जाणारा नोबेल हजारे हा पहिला वि
द्यार्थी आहे .
No comments:
Post a Comment