Tuesday, 18 July 2023

कुणाचं नाव चटकन आठवत नाही, कामांचा विसर पडतो? ४ गोष्टी खा, स्मरणशक्ती वाढेल.....*

 *कुणाचं नाव चटकन आठवत नाही, कामांचा विसर पडतो? ४ गोष्टी खा, स्मरणशक्ती वाढेल.....*


कामाच्या व्यापात आपण खूप काही गोष्टी करायला विसरतो. मन स्थिर नसेल, किंवा लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे लागले असेल की, आपल्याकडून नकळत अनेक कामांकडे कानाडोळा होतो. काही लोकं कामाच्या व्यापात इतके गुंतता की स्वतःकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अशा परिस्थितीत शारीरिक आरोग्यासोबतच बौद्धिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढते.


अति व्यापामुळे मेंदूलाही थकवा जाणवतो. जर मेंदूला तीक्ष्ण करायचे असेल तर, आहारात या ३ गोष्टींचा समावेश करा. यासंदर्भात, एमडी एमईडी, डीएम न्यूरोलॉजी डॉक्टर प्रियांका शेरावत सांगतात, ''मेंदूची कॉग्नीटिव स्किल वाढवायची असेल तर, आहारात काही बदल करणे गरजेचं आहे. काही पदार्थ आजपासून खाण्यास सुरुवात करा. ज्यामुळे मेंदूला नवीन चालना मिळेल, व फ्रेश वाटेल''


*स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खा हे पदार्थ...*


*ओमेगा-३...*

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा-३ व फॅटी ऍसिडयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करा. डॉक्टर प्रियांका यांच्या मते, ''दिवसाची सुरुवात नेहमी २ बदाम आणि २ अक्रोडने खाऊन करा. हे पदार्थ मेंदूचे कार्य आणि विकास दोन्ही सुधारतात.''


*व्हिटॅमिन सी फळे...*

फळांचे सेवन करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतू आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी फळांचे सेवन करा. यासाठी आहारात संत्री, किवी, हंगामी फळांचा समावेश जरूर करावा. जे आरोग्यासाठी व मेंदूसाठी एक उत्तम आहार आहे.


*झिंक समृद्ध पदार्थ...*

डॉक्टरांच्या मते, ''अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले की, मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आहारात झिंकचा समावेश हवाच. हे पोषण संपूर्ण धान्य, शेंगा इत्यादींमध्ये आढळते.


*फ्लेक्स सीड्स आणि डार्क चॉकलेट...*

अनकेदा मूडचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ते वाढवण्यासाठी डार्क चॉकलेटचा आहारात समावेश करा. त्यात ओमेगा-३, फॅटी एसिड्स आढळते. ज्यामुळे अधिक कॅलरीज वाढत नाही, यासह फ्लॅक्स सीड्स खाणेही फायदेशीर ठरते.


*©कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार, 


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi