श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याची उत्साहात सांगता;
दिंडी सोहळ्याने परळी शहर भक्ती माय झाले होते
परळी / प्रतिनिधी
येथील संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहरातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील सात दिवसापासून मंदिरात सुरू असलेल्या समाधी सोहळ्याची सांगता आज सोमवारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. माळी समाजाने मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते तर टाळ मृदंगाचा गजर आणि हलगी लेझीम पथकाच्या निनादाने संपूर्ण परळी शहर भक्तिमय झाले होते.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मागील सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सात दिवसात महाराष्ट्रातील प्रसिद्ध हरिभक्त पारायण कीर्तनकार महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन साथ ही दिवस करण्यात आले होते. विशेष म्हणजे साथ ही दिवस समाजातील अन्नदात्यांनी दररोज दोन दिवस महापंक्तीचे आयोजन करण्यात येत होते अखंड साथी दिवस हरिनामाच्या गजरासह अन्नदान अविरत चालूच होते. सात दिवसापासून हरिनामाच्या गजरात भक्तिमय झालेल्या मंदिर परिसर आज संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीने गजबूजून गेला होता केवळ माळी समाज नव्हे तर या परिसरातील अठरापगड समाजातील महिला पुरुष बालवृद्ध आधी भाविकांनी दररोज किर्तन ज्ञानेश्वरी पारायण भजन आणि पोथी अशा सर्वच धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला अशा सात दिवस चालणाऱ्या श्री संत सावता महाराज समाधी सोहळ्यात आज सातव्या दिवशी संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी कीर्तन होऊन दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली होती गणेशपार मार्गे अंबिवेश वैद्यनाथ मंदिर चे मित्र नागा संत सोपान काका मंदिर नेहरू चौक टावर मोंढ्यातील मारुती मंदिर आर्य समाज रोड जाजूवाडी विठ्ठल मंदिर पद्मावती मार्गे दिंडी गणेश पार रस्त्याने संत सावता महाराज मंदिरात सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विसर्जित करण्यात आली या दिंडी सोहळ्यात परळी सह पंचक्रोशीतील भाविक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते दिंडीतील कलशधारी महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तर समोर असलेले ध्वज आणि टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम च्या गजराने अक्षरशः परळी शहर दुमदुमून गेले होते या दिंडी सोहळ्यानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोक बंदोबस्त तैनात केला होता तर समाज बांधवांनीही सर्व दक्षता आणि पोलिसांचे नियम पाळून दिंडी सोहळा आनंदात आणि उत्साहात पार पाडला. दरम्यान या सात दिवसात चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर सोहळा सप्ताहाची सांगता आज सोमवार दिनांक 17 रोजी काल्याच्या कीर्तनाने हो
णार आहे.
No comments:
Post a Comment