Saturday, 29 July 2023

जॉन्सन बेबी पावडर कंपनीवर कारवाई करण्यात दिरंगाई नाही

 जॉन्सन बेबी पावडर कंपनीवर कारवाई करण्यात दिरंगाई नाही


 - अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम


       मुंबई, दि.२८ : "जॉन्सन बेबी पावडर" यांच्या उत्पादनाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती चौकशी करून राज्य शासनाने त्याचे उत्पादन तत्काळ बंद केले आहे याबाबतीत कुठेही दिरंगाई झाली नसल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत दिली.


यासंदर्भात लक्षवेधी सूचना सदस्य सुनिल शिंदे यांनी मांडली होती. मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, मे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व त्याखालील नियमाअंतर्गत सौंदर्य प्रसाधने उत्पादन परवाना धारण करत होती. उच्च न्यायालयाने ११/०१/२०२३ च्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाने उत्पादन बंदीचे पारीत केलेले आदेश रद्द केले होते. त्यानंतर, मे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन प्रा. लि. यांनी स्वतःहून निर्णय घेवून उत्पादन परवाना दि.२२.०६.२०२३ रोजी अन्न व औषध प्रशासनास (Surrender) प्रत्यार्पित करून "जॉन्सन बेबी पावडर" याचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात बंद केले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५ मधील तरतूदीचे उल्लंघन केल्यास त्याबाबत कंपनीकडून नुकसान भरपाई घेण्याची तरतूद नाही असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi