Thursday, 1 June 2023

हृदयाची दुर्बलता*

 *हृदयाची दुर्बलता*


◼️तुळशीच्या बियांचे अर्धा ते एक ग्रॅम चूर्ण तेवढ्याच खडीसाखरेबरोबर घेतल्याने किंवा मेथीच्या २० ते ५० मि.ली. काढ्यात (२ ते १० ग्रॅम मेथी १०० ते ३०० ग्रॅम पाण्यात उकळावी) मध घालून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️अर्जुनसालीचे १ चमचा चूर्ण व दोन चमचे धने पूड, १ ग्लास पाण्यात उकळून घ्यावे. प्यायल्याने खूप लाभ होतो. याशिवाय लसूण, आवळा, मध, आले, बेदाणा, द्राक्षे, ओवा, डाळींब इ. पदार्थांचे सेवन हृदयासाठी लाभदायक आहे.


◼️लिंबाच्या सव्वा तोळा (सुमारे १५ ग्रॅम) रसात आवश्यकतेनुसार खडीसाखर घालून प्यायल्याने हृदयाचे स्पंदन सामान्य होते तसेच स्त्रियांमध्ये हिस्टेरियामुळे वाढलेली हृदयाची धडधडदेखील दोन लिंबांचा रस पाण्यात घालून प्यायल्याने शांत होते.


◼️गुळवेलीचे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने किंवा आल्याचा रस व पाणी समप्रमणात एकत्र करून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️उगवत्या सूर्याच्या शेंदरी किरणांमध्ये (सुमारे दहा मिनिटेपर्यंतच्या) हृदयरोग दूर करण्याची अपरिमीत शक्ती असते. म्हणून रुग्णाने प्रातःकाळी सूर्योदयाची वाट पहावी आणि सूर्याचा पहिला किरण त्याच्यावर पडेल असा प्रयत्न करावा.


◼️मोठ्या गाठीच्या हळकुंडाची वस्त्रगाळ पूड करून आठ महिने ठेवून द्यावी. नंतर दररोज देशी गाईच्या दूधतून किंवा तुपातून एक चमचा घालून प्यावी. हळदीत हा खास गुण आहे की ती रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले रक्ताचे थर विरघळविते आणि रक्तवाहिन्या साफ करते. जेव्हा रक्तवाहिन्या साफ होतात तेव्हा तो कचरा म्हणजेच विजातीय द्रव्ये पोटात गोळा होतात व नंतर मलावाटे बाहेर टाकली जातात.


◼️रोहिणी हिरड्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवून द्यावे. रोहिणी हिरडा न मिळाल्यास बेहड्याच्या आकाराचा कोणताही हिरडा घ्यावा. या हिरड्याचे सुमारे १ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईच्या दुधातून किंवा तूपाबरोबर घ्यावे. यामुळे विजातीय द्रव्ये मल, मूत्र व घाम इ. रूपात शरीरातून बाहेर टाकली जातात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi