Monday, 19 June 2023

शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा!*

 *शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा!*


 डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि सध्याच्या या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून आपण आपल्या परिने बरीच काळजी घेत असतो. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच. एकदा दृष्टी कमजोर झाली की मग एकतर चष्मा सतत डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सतत डोळ्यांच्या दवाखान्यात फे-या घालाव्या लागतात. म्हणूनच चष्मा लागण्याआधी किंवा दृष्टीवर परिणाम होण्याआधीच वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्यासोबतच आपण काही घरगुती उपाय देखील करुन डोळ्यांना स्वस्थ ठेवू शकतो. दररोज या काही फळांचा आहारात समावेश करुन तुम्ही डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. तर जाणून घेऊया तुमच्या उपयोगी पडतील अशा काही साध्या-सोप्या टिप्स.

गुलाबजल’ या शब्दांतच किती थंडावा दडलाय. गुलाबजल खूप थंड असल्यामुळे सहाजिकच ते डोळ्यांसाठी खूपच प्रभावी मानले जाते. तसं तर गुलाबजल हे मुड फ्रेश करणे, कांती उजळणे, त्वचा मुलायम करणे अशा अनेक गोष्टींमध्ये लाभदायक ठरते. पण एका अभ्याअंती असे सिद्ध झाले आहे की गुलाबजलचा वापर केल्याने आपली दृष्टी वाढण्यासही मदत होते. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा आराम देण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोळ्यांत गुलाबजलाचे दोन ते तीन थेंब टाकू शकता. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे किंवा काळे डाग कमी करण्यासाठी देखील तुम्ही गुलाबजलचा जरुर वापर करू शकता.मोहरीचे तेल खरोखरंच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास लाभदायक ठरते. चाचणी दरम्यान, दररोज या लोकांच्या पायाला १० मिनिटे मोहरीच्या तेलाने मसाज करण्यात आली आणि आश्चर्य वाटेल पण त्यांच्या दृष्टीमध्ये खरोखरच सकारात्मक बदल दिसून आले. म्हणूनच वैज्ञानिक निकषांच्या आधारे, दररोज न चुकता मोहरीच्या तेलाने १० मिनिटे मसाज केल्याने डोळ्यांची दृष्टी अधिकव्यायाम केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? डॉक्टरांच्या अभ्यासानुसार न चुकता नियमित व्यायाम करणा-या आणि वजन नियंत्रित ठेवणा-या लोकांची दृष्टी ही सामान्य लोकांपेक्षा अधिक चांगली असते. वजन वाढल्यामुळे डायबिटीज २ (मधुमेह) असलेल्या लोकांची दृष्टी कमजोर होत जाते. याच कारणामुळे नजर साफ असण्यासाठी सर्वात आधी तुमचं वजन नियंत्रित असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि आपली दृष्टीत अनेक सकारात्मक बदल घडवून आणा. 

बदामाने स्मरणशक्ती वाढते, कांती उजळते आणि यासोबतच अनेक लाभ होतात हे आपल्याला माहितच आहे. पण बदामाच्या सेवनाने डोळ्यांची नजर देखील वाढते.बदामा मध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही दररोज दुधात बदामाची पुड टाकून त्याचे सेवन करू शकता. असे केल्याने तुम्हाला दुध आणि बदाम असे दोन्हीतील व्हिटॅमिन ‘ए’ मिळतील आणि डोळ्यांची दृष्टी अधिक बळकट होण्यास मदत होईल. टाकलेल्याआवळ्यातील अॅंटिऑक्सिडंट डोळ्यांचा पडदा निरोगी ठेवण्याचे काम करतात. डोळ्यांतील पडदा निरोगी राहिल्याने आपली दृष्टीदेखील चांगली राहण्यास मदत होते दुधाचे सेवन करतातअसे कितीतरी पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने डोळ्यांना त्याचे फायदे होतात. या मध्ये प्रामुख्याने गाजर, अक्रोड, ब्रोकोली आणि पालक या भाज्यांचा आणि फळांचा समावेश असतो. म्हणूनच या पदार्थांना आपल्या आहारात समाविष्ट करुन तुम्ही डोळे निरोगी ठेऊ शकता.


दृष्टी आहे तर सृष्टी आहे. निरोगी आणि साफ दृष्टी असणं फार गरजेचं आहे कारण त्यामुळे आपण हे सुंदर जग पाहूच शकत नाही तर त्याचा आनंदही घेऊ शकतोय. आपण शरीरातील इतर अवयवांची जशी काळजी घेतो तसंच डोळा हा देखील एक महत्वाचा अवयव आहे आणि त्याची यथायोग्य काळजी घेणं आपल्या हातात असतं. म्हणूनच डोळ्यांची काळजी घ्या आणि दृष्टीला निरोगी बनवा.

प्रमोद पाठक.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi