Monday, 26 June 2023

मन शुद्ध तुझे गोष्ट आहे लाख मोलाची

 ✍️ *अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाच नाही तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे बोलताना जरा सांभाळून बोलावे शब्दांना तलवारी सारखी धार असते फरक फक्त एवढाच कि तलवारीने मान आणि शब्दांनी मन कापले जाते पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे शुल्लक गोष्टीसाठी खोटं बोलणारी माणसे ही जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत जोपर्यंत आपण बेदम मेहनत करायला सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वप्नं झोपेतचं दिसतील प्रत्यक्षात नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष्यात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होते‌‌ समाधान तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचा जन्म नव्हे तर तुमचं कर्म ठरवत असते कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो त्याला त्याच कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो स्वतःची ओळख लपवणारी माणसं कधीच विश्वास पात्र नसतात शब्दकोडी सोडवताना बुध्दीची कसोटी लागते तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खुप हसतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून रडत असतो काही नाती अळवावरच्या पाण्यासारखी असतात साठतं पण लगेच वाहतं पण लगेच पूर्व जन्मातील नाती असतात ती राहीलेला हिशोब पूर्ण करतात कधी सुख देऊन तर कधी दुःख तुमच्यात असणारी जिद्द च तुम्हाला सिध्द करण्यास भाग पाडते नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं आयुष्य जास्त सुंदर वाटत प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमीच जीवंत राहतात मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही परमात्मा कधीच कुणाचं भाग्य लिहित नाही भाग्य लिहीतात ते आपले विचार व्यवहार आणि कर्म मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो त्यामुळे आनंदी रहा खुश रहा स्वतः हसा व दुसऱ्यांनाही हसत ठेवा हेच यशस्वी जीवनाचे गमक होय साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही रंग असे ऊधळा की नंतर त्यांचे डाग म्हणून नाही तर गोड आठवण असं अस्तीत्व राहील जे दिसतं ते सत्यात असतच असं नाही हसतोय म्हणून सुखी आहे पण तसं नाही*✍️


*👏विचारधन परिवर्तन👏*


    *🕉️शुभदिन 🕉️*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi