Monday, 19 June 2023

देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे

 देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे

- भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवी यांचे प्रतिपादन

- कांदिवली पूर्वमध्ये 'मोदी@९' कार्यक्रम उत्साहात

- आमदार अतुल भातखळकर यांचे नियोजन

मुंबई : भारताला विश्वगुरु बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. सत्ता हे साधन मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक म्हणून काम करत आहेत.देशाला पुढे नेण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. जातपात न बघता देशासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला मतदान करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय महासचिव तसेच महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केले. कांदिवली पूर्व विधानसभेत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'मोदी@९' अंतर्गत बुद्धीजिवी संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री कृपा शंकर सिंग, खा. गोपाळ शेट्टी, संजय उपाध्याय यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


सी. टी. रवी म्हणाले, काँग्रेसच्या काळात सुमारे २०० घोटाळे झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ९ वर्षाच्या काळात अनेक सुधारणा केल्या आहेत. विमानतळे, विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, मेट्रो, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, स्टार्टअप, सागरमाला अशा अनेक सुधारणा मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाल्या आहेत. देशाला स्वावलंबी बनवायचे आहे, हे मोदीजींचे स्वप्न आहे. देशासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणे आवश्यक आहे, त्यासाठी सर्वांना निवडणूक योद्धा म्हणून काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. 

आगली बारी नरेंद्र मोदी - आ. भातखळकर


देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून झालेला बदल दिसतोच आहे. कोविड महामारीत १३० कोटी लोकसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या देशात केलेली यशस्वी टाळेबंदी हे जगापुढे आदर्श ठरली. कोविड चाचण्या असोत किंवा लसीकरण असो मोफत आणि अत्यंत सुरळीत पार पडले. अत्यंत कुशलतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व परिस्थिती हाताळली. युक्रेन-रशिया युद्ध प्रसंगात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणले. जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम त्यांनी केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक असून पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, ही देशातील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले.



'मोदी@९' अंतर्गत विधानसभा मतदारसंघात मालाड येथे 'टिफिन बैठक' उत्साहात पार पडली. हनुमान नगर येथे महिला आधार भवनमध्ये बचत गट आणि लाभार्थी संमेलन पार पडले. लोखंडवाला येथे प्रभावशाली व्यक्ती संमेलनात परिसरातील नागरिक बंधू-भगिनी सहभागी झाले होते. त्यांच्याशी सी. टी. रवी यांनी संवाद साधला. यासह आमदार अतुल भातखळकर यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या कॅन्सर रुग्ण सेवा केंद्र, लोखंडवाला येथिल स्व. गोपीनाथ मुंडे उद्यान सुशोभीकरण, रोटी बँक अशा विविध उपक्रमांना सी. टी. रवी यांनी भेट देऊन या उपक्रमांचे कौतुक केले. यासह 'मोदी@९' अंतर्गत विविध कार्यक्रम पार पडले. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi