Saturday, 3 June 2023

अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का

 *अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का ?*


तुम्हाला अपरात्री मध्येच भूक लागते का? मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही.आपल्या रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिजमध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिजमध्ये ठेवलेले असते असे खातो.


एका नव्या सर्वेक्षणानुसार मध्यरात्री खाणे, अपूर्ण झोप आणि लठ्ठपणा यात दुवा असल्याचे दिसून आले. हा अभ्यास ऍरिझोना विद्यापीठात केला गेला. यात असे दिसून आले की, ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो.


या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की, अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात. शास्त्रज्ञांच्या मते, झोपेचा देखील आपल्या चयापचयवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे दर्शविण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे.


मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग, रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा, दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.


जर का तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्सपासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.


अगदी थोडे पाणी प्या, बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो. 


शक्यतो अशी भूक मानसिक असते. कटाक्षाने खाणे टाळा. प्रयत्नपूर्वक काहीही न खाण्याची सवय लावा. सवय लागतेच.


आपल्या आयुष्यातील ताण कमी करा, यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागेल.


दिवसा व्यवस्थितपणे खाल्याने, तुम्हाला अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.


आता तुम्हाला समजले असेल कशाप्रकारे आपण शांत झोप मिळवू शकतो. तसे प्रयत्न करून किमान सहा ते आठ तास झोपा आणि मध्यरात्री उठून जंक फूड खाणे टाळा!


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi