Sunday, 4 June 2023

जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर नगर

 ---------------------------------------------

आज दिनांक 04 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब कार्यक्रमानिमित्त शहरात येणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या पूर्वतयारी साठी, तसेच नगर येथे होणाऱ्या सभेच्या पूर्वतयारी च्या अनुषंगाने राष्ट्रवादी भवन येथे सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वर्धापनदिन निमित्ताने ध्वजारोहण व इतर कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले आम् आदमी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पूर्व शहर कार्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील ह्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडे शहर जिल्हा मुख्य सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली.  ख्वाजा शराफोद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली  नेतृत्वाखाली आणि रघुनाथदादा पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी पक्षाचे सुरजीत सिंग खुंगर, सलीम पटेल वाहेगावकर, अयुब खान, मेहराज बेगम, मुन्ना भाई,  म. गयास बागवान, अंकुश आगे, आशिष शिसोदे, रवींद्र जायभाये, मंगेश तिळवे, अनिल डोंगरे, कन्हैयालाल मिसाळ, प्रशांत मोतीलाल जगताप ,सुभाष जाधव, फुलचंद जाधव, विठ्ठलराव जाधव, आश्रफ पठाण, सलीम शेख, विलास डंगारे, आर. बी. पाटील, मोहम्मद रफी,  इरफान शेख, पठाण इब्राहिम साहेब, आप्पा पगारे, फैयाज रशीद, सय्यद रियाज, भिकन शाह, जहीर केसरी, शेख अनवर शेख कैसर ,शेख जफर शेख गफार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi