वैद्य विनायक खडीवाले
शहरी संस्कृतीचा प्रभाव म्हणून स्त्री-पुरुषांच्या गुडघ्याचे विकार वाढत आहेत. शेतमजूर, कामगार, ओझेवाले, हमाल यांच्या गुडघ्याचे विकार आपण समजू शकतो; पण शहरांमध्ये जिने चढ-उतार, उभ्याचा ओटा, जमिनीवर बसून काम करण्याची बंद झालेली सवय, फाजील चहा-पाणी आणि अवेळी खाणे यामुळे गुडघ्यांच्या हाडांच्या सांध्यावर दाब पडतो. तेथील ‘वंगण’ कमी होते. गुडघ्यांच्या आतील बाजूला सूज येते, कटकट आवाज येतो, उठा-बसायला विलक्षण त्रास होतो. काहींना शौचास बसायला फार कष्ट होतात. याच विकाराला सामान्य माणूस गुडख्यात पाणी झाले असे म्हणतात.

पा
श्चात्य वैद्यकात पाणी काढणे या उपायाचे किंवा गुडघ्यात इंजेक्शन देणे याचे मोठे बंड माजले आहे; पण त्यामुळे गुडघ्यात पाणी पुन: पुन्हा होणारच. गुडघ्यातील हाडांची सूज कमी व्हावी, दुखणे कमी व्हावे आणि नेहमीच्या उठ-बसमध्ये चालण्यात व्यत्यय येऊ नये, याकरिता प्रथम नेमक्या दुखण्याच्या जागी चार लेपगोळ्यांचा दाट आणि गरम लेप लावावा. त्याकरिता प्रथम त्या गोळ्या पाण्यात भिजवाव्या नंतर पाट्यावर वाटून मग पळीत दाट गरम लेप लावावा. त्याशिवाय बलदायी महानारायण तेल सकाळी आंघोळीपूर्वी व रात्री झोपण्यापूर्वी गुडघ्याला व पायाला खालून वर असे जिरवावे. लाक्षादिगुग्गुळ, त्रिफळागुग्गुळ, गोक्षुरादिगुग्गुळ, सिंहनादगुग्गुळ, प्रत्येकी तीन गोळ्या, बारीक करून पाण्याबरोबर घ्याव्या. स्थौल्य जास्त असल्यास सोबत आरोग्यवर्धिनी घ्याव्यात.
पांडुता आणि गुडघ्यावरील सूज जास्त असल्यास चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी या दोन गोळ्या इतर चार गोळ्यांबरोबर द्याव्या. गुडघ्याच्या तक्रारींबरोबर पाठ, कंबरदुखी असल्यास संधिवातारी, आणि गणेशगुग्गुळ ही जादा औषधे सकाळ इतर चार गोळ्यांबरोबर घ्याव्या. अशक्तपणा असल्यास आस्कंदचूर्ण 1 चमचा घ्यावे. मलावरोध असल्यास गंधर्वरीतकी घ्यावे.
विशेष दक्षता
गुडघ्याच्या हाडाच्या वाटीची आणखी झीज होणार नाही आणि झालेली झीज भरून यावी म्हणून योजना हवी. तसेच फाजिल वजन वाढू नये आणि सूज कमी व्हावी म्हणून लेखनीय औषधे आणि नेमके व्यायाम योजावे. माफक प्रमाणात तूप, उडीद, डिंक, गहू, मूग, सात्विक आहार, लसूण, पुदिना, आले असी चटणी, स्निग्ध आणि किंचित उष्ण असा संतुलित आहार घ्यावा. खारट, आंबट, तिखट आणि आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड, दही, शिळे अन्न, पाव, फरसाण, इडली, डोसे, कोल्ड्रिंक, कृत्रिम पेये वर्ज्य करावे. कटकट आवाज येत असल्यास गुडघ्यांना पूर्ण विश्रांती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरेकी जिने चढ-उतार आणि खूप वजन उचलणे वर्ज्य करावे
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment