*वजन कमी करताय शुगर फ्री वापरू नका.*
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वजन कमी करण्याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी शुगर फ्री स्वीटनर्सचा (गोडवा निर्माण करणारे पदार्थ) वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, साखरेऐवजी नॉन-शुगर स्वीटनर्सच्या वापराचा प्रौढ किंवा मुलांच्या शरीराचे वजन कमी करण्यात दीर्घकाळ कोणताच फायदा होत नाही. तथापि, यामुळे वजन किरकोळ कमी होते, पण ते अधिक काळ कायम राहत नाही. इतकेच नाही तर यांच्या वापरामुळे टाइप-२ मधुमेह, हृदयविकाराचा धोका आणि प्रौढांमध्ये मृत्यू दर वाढू शकतो. सल्ल्यानुसार, लोकांनी इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे. जसे की, ज्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या गोडवा असतो अशा पदार्थांचे सेवन करणे. उदाहरणार्थ फळे किंवा गोड नसलेले अन्न आणि पेय पदार्थ. डब्ल्यूएचओचे संचालक (न्यूट्रिशन अँड फूड सेफ्टी) फ्रान्सिस्को ब्रान्का यांच्या मते, ज्यांना आधीपासून मधुमेह नाही त्या सर्वांसाठी हा सल्ला लागू आहे.
केवळ माहिती साठी #आयुर्वेदप्रचार
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment