गारपीट, एल-निनो आणि २०१४...
एका सरकारी कार्यालयात गेलो होतो. एक मासिक पाहिले. कव्हरवर मथळा (हेडिंग) होता= गारपिटीने झोडपलेच; आता एल-निनो?
अरे, काय चपखल मथळा दिलाय, असं कौतुक करतच मासिक हातात घेतलं. अंक होता, "सकाळ साप्ताहिक" चा, पण तारीख आताची नव्हती. ती होती, १७ मे २०१४!
आताही अगदी तशीच परिस्थिती आहे. गारपीट, वादळी पावसाने या वर्षी हजेरी लावलीच, शिवाय या वेळच्या मान्सूनवर 'एल-निनो' ची टांगती तलवारही आहे.
यावरून अनेक जण निसर्गाचं चक्र आणि हवामानाच्या घटनांचं पुन्हा पुन्हा अवतरणं, यासंबंधी थेट व सरधोपट अर्थ काढतील. हवामानाच्या विविध घटना, मग ते चक्रीवदळ असो, एल-निनो, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा आणखी काही, या ठराविक अंतरानंतर घडतच असतात. पण या संदर्भात कोणतंच वर्ष आधीच्या कोणत्याही वर्षासारखं हुबेहूब नसतं. पण आधीच्या वर्षाची आठवण देणारं असतं हे नक्कीच.
तसं साधर्म्य आता तरी या दोन वर्षांमधे दिसत आहे, २०१४ आणि २०२३ !
- अभिजित घोरपडे, भवताल
भवताल
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment