Friday, 28 April 2023

उन्हाळ्यात नियमित ताक प्या, आरोग्य सुधारा.....*

 *उन्हाळ्यात नियमित ताक प्या, आरोग्य सुधारा.....*


सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. या ऋतूमध्ये ताक, शहाळे, सरबत पिणे खूप महत्त्वाचे आहे. दही हे अत्यंत गुणकारी आहेच. त्यात दही थोडे पाणी घालून घुसळून त्याचे ताक केले असता ते जास्त गुणकारी आहे.


आयुर्वेदात ताकाचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. शरीराची पचन व्यवस्था स्वच्छ करणारे गुणधर्म असतात. जेवण झाल्यानंतर मीठ घातलेले ग्लासभर ताक पिण्याने अन्न पचण्यास खूप मदत होते. 


लोणी काढून झाल्यावर खाली राहणारे ताक हे अत्यंत गुणकारी, पाचक रस वाढवणारे आहे. लोणी न काढता केलेले ताक हे पौष्टिक आहे. परंतु ते पचण्यास जड व कफकारक आहे.


*ताक पिण्याचे फायदे...*


*१. ताकात सुंठ, काळी मिरी आणि पिप्पली घालून सेवन केले असता कफ दोष कमी होतो.


*२. नियमित ताक पिण्याने आपल्या शरीराची पचन शक्ति सुधारते. मूळव्याध, बद्धकोष्टता कमी होते. आयुर्वेदात मुळव्याधीवर नियमित ताक पिणे हा घरगुती उपाय सांगितला आहे.


*३. लघवी करताना वेदना होत असतील तर ताजे व पातळ ताक प्यावे. 


*४. गोड ताक हे पित्तशामक असते. गोड ताकामध्ये साखर घालून ते पिण्यामुळे पित्त कमी होते.


*५. वात दोष असल्यास अदमुरे ताक सुंठ व सैंधव घालून प्यावे.


दुपारचे जेवण झाल्यानंतर पिलेले ताक सर्वाधिक गुणकारी आहे. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी ताक घेऊ शकता. तेदेखील प्रकृतीस उत्तम आहे.


*ताक पिताना पुढील काळजी घ्यावी...*

पावसाळ्यात जास्त ताक पिऊ नये. तसेच खूप आंबट झालेले ताक पिऊ नये.


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi