महालक्ष्मी रेसकोर्स, विविध जिमखाने व भूभागांबाबत
लवकरच नवीन धोरण जाहीर करणार
- उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 8 : महालक्ष्मी रेसकोर्स,विविध जिमखाने व तत्सम भूभागांबाबत लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल, असे उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिले.
महालक्ष्मी, मुंबई येथील रेसकोर्स भूखंडाचे नूतनीकरण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याबाबत विधानपरिषद सदस्य सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, महालक्ष्मी रेसकोर्स, विविध जिमखाने व तत्सम भूभागांच्या नियम उल्लंघनाच्या तक्रारींच्या अनुषंगाने नवीन नियमावली करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच महालक्ष्मी रेसकोर्सच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांतून ४ कोटी ४० लाख रूपये शासनाकडे जमा केले आहेत तसेच जे ६ कोटी रूपये थकीत आहेत, त्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस काढलेली असल्याचेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी सदस्य सर्वश्री विलास पोतनीस, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
No comments:
Post a Comment