Thursday, 2 February 2023

अभिनंदन

 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर.

            मुंबई, दि. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२२ मधील अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.


             69 पदांसाठी झालेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयीन विभागातून शिवकुमार चंद्रकांत माशाळकर (बैठक क्रमांक - MB001044) हे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातून अविनाश पंढरीनाथ बडधे (बैठक क्रमांक - MB002014) हे प्रथम आले आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


            या अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे, असे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi