विधानपरिषदेच्या कामकाजास वंदे मातरम् व राज्यगीताने प्रारंभ
मुंबई दि.२७ – विधिमंडळाच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या विधापरिषदेतील कामकाजास वंदे मातरम् आणि जय जय महाराष्ट्र माझा...या राज्य गीताने सुरुवात झाली.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...’ या राज्यगीताने सभागृह दुमदुमले होते.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीतास राज्य गीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कवी राजा बडे यांनी लिहिलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत सीमा आंदोलनाच्यावेळी मराठी मनाला प्रेरणा देणारे ठरले होते. या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले असून, हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.
No comments:
Post a Comment