Sunday, 5 February 2023

जिंदगी

 *कधीकधी केराचा डबाही, मनापेक्षा बरा वाटतो...!*


*दिवसातून एकदा का होईना निदान तो रिकामा तरी होतो...!!*


*आपण मात्र मनात कितीतरी, दुःखद आठवणी साठवतो...*


*काय मिळवतो यातून आपण...? स्वतःचे दुःख वाढवत रहातो...!*


*घडून गेलेल्या वाईट गोष्टी, वर्षानुवर्षे मनात ठेवतो...*


*त्या ज्याच्यामुळे घडल्या, त्यांचा पुढे तिरस्कार करतो...!*


*आता केराच्या डब्यासारखच, दररोज मनही साफ करायचं...*


*विसरून सारे जुने दुःख, स्विकारुन नव्या सुखांना आनंदाने भरायचं...!*


*सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं.*


*स्वतः नेहमीच आनंदी रहायचं...!*

*आणि, दुसर्‍यांनाही आनंदी ठेवायच...!!*


*मन साफ तर सर्व माफ...!!*

 🤝🌹〽️🌹🤝

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi