नारायणराव पत्त्याच्या जुगारात पाच लाख रुपये हरले.. त्या धक्क्याने हार्ट अ टॅक येऊन त्यांचा जागेवरच मृ त्यू झाला… त्यांच्या मित्रांना धडकी भरली. “वहिनींना सांगायचं कसं ?”.
अखेर लक्ष्मणराव म्हणाले “मी सांगतो, द्या इकडे फोन!”. लक्ष्मणरावांनी वहिनींना फोन लावला, “हां वहिनी, मी लक्ष्मण बोलतोय!”
“काय म्हणताय भाऊ ?” लक्ष्मीबाई म्हणाल्या. ” काही नाही, नारायणराव पत्त्यात दोन लाख रुपये जिंकलेत!” “अय्या, खरंच काय.. येऊ द्या घरी, दृष्टच काढते बाई त्यांची!”.
” नाही वहिनी, नंतर काय झालं, ते पाच लाख रूपये हरलेही !”. “काय, पाच लाख घालविले ?” लक्ष्मीबाई कडाडल्या! “त्यापेक्षा उलथून का गेले नाहीत !”.
“तेच झालंय सांगायला फोन केला होता, लक्ष्मणराव उलथले!!!😂
No comments:
Post a Comment