. *‼️ भावकी ‼️
*_संकलन : मिलिंद पंडित, कल्याण_*
"आमची भावकी चांगली आहे" म्हणणारे फार दुर्मिळ आहेत. "आमच्या सारखी भावकी कोणाचीच नाही" असे म्हणणारेही खूप आहेत.
खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे. अनेक पिढ्या, घरे, घराणी यात भूईसपाट झाल्याचा इतिहास आहे.
शहाजीराजे, शिवराय, शंभूराय यांनाही याच्या झळा लागलेल्या आहेत. पुण्यातील पेशव्यांनी तर यात कळस गाठला आहे. ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेत. थोडक्यात, यातून कोणाचीच सुटका होत नाही, कारण तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो. कारण, भावकीतील व्यक्तीला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार, गर्व दडलेला असतो, त्याचा मद व्यक्त करण्यात एक असूरी आनंद असतो.
आज दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे, शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या भांडणाचा क्रमांक नेहमीच पहीला आहे.
उत्पन्नाचा किती भाग आज समाज यावर खर्च करतोय. अल्प असलेल्या आयुष्यात किती वेळ सत्कारणी लागतोय आणि पुढच्या पिढीला आपण काय देतोय? हे प्रश्न जरी स्वतःला आपण दररोज विचारले तरी आपल्यात बदल होऊ शकतो आणि हेच आपल्या हातात आहे.
भावकीला बदलवणे शिवरायांना जमले नाही. पेशव्यांनाही जमले नाही. आपल्यालाही ते जमणार नाही. बदल स्वतःत केला पाहीजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका.
भावकीशी बोलताना शक्यतो प्रतीहल्ला टाळा. त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया टाळा. त्यांनी खोडी काढली तर प्रतिशोध टाळा. सर्वात महत्वाचे भावकीची निंदा करणे सोडून द्या आणि दुसरा कोणी आपल्या भावकीची निंदा करत असेल तर ऐकून घेऊ नका आणि सहनही करू नका.
त्यांनी साद घातली तर प्रतिसाद द्यायला विसरू नका. भावकीच्या यशाचे मन आणि तोंडभरून खरे कौतुक करायची सवय लावून घ्या. अडचणीच्या काळात मदतीचा हात स्वतः होऊन पुढे करा कारण भावकी मेली तरी भावकीच्या पुढे मदतीसाठी हात पसरत नाही. तो हात आपण समोर केला तर त्याच्या सारखे दुसरे समाधान नाही हे सर्व खूप अवघड आहे.
पण आजच्या काळात भावकी खूप गरजेचे आहे कारण आपण सर्वजण खूप अडचणीत आणि संकटात आहोत. या क्रियेने एकवेळ भावकीची साथ नाही मिळाली तरी चालेल, पण भावकीचा त्रास वाचला तरी हे थोडे नाही. कारण आयुष्यातील निम्मी शक्ती, संपत्ती आणि बहूमुल्य वेळ आपला यातच वाया चालला आहे.
सुधारायचे असेल तर ही शक्ती, संपत्ती आणि वेळ सत्कारणी लावता आला पाहीजे. भावकीतील वाद संपवणे हे सर्वात मोठे काम आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
म्हणूनच आमच्या पूर्वजांनी, संस्कृतीने अंतिम यात्रेत चार पैकी तिन खांदेकरी भावकीचे असावेत ही अट घातली आहे.
कितीही भांडा, प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार आहे.
🙏🙏🙏
************************************
No comments:
Post a Comment