Monday, 9 January 2023

साखरे ऐवजी गुळ का खावा?*

 *साखरे ऐवजी गुळ का खावा?*


▪️ *फुफ्फुसातील संसर्ग रोखतो* गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.


▪️ *पोटाच्या तक्रारींवर गुणकारी* पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.


▪️ *आंबट ढेकरींपासून सुटका* – गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.


▪️ *सांधेदुखीतून सुटका* –

 सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.


▪️ *थकवा दूर होतो* – 

गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.


▪️ *रक्ताची कमतरता भरून निघते* -

गूळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.


▪️ *रक्तदाब नियंत्रणात राहतो* - गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.


▪️ *हाडं मजबूत होतात* - गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.


▪️ *शरीर कार्यक्षम राहतं* गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.


▪️ *सर्दीवरही गुणकारी* सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.


▪️ *डोळ्यांसाठीही लाभदायी* – गूळ खाल्ल्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासही मदत होते.



धन्यवाद, 🙏

आमच्याकडे सात्विक कृषीधन अंतर्गत नैसर्गिक गुळ, खांडसरी साखर, गूळ पावडर, तुप वगैरे तसेच इतर नैसर्गिक व सेंद्रीय ऊत्पादने उपलब्ध आहे. 


*"नजिकच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात उपलब्ध, कृपया लवकरात लवकर संपर्क करावा.....*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi