*'के.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर!'*
पंतप्रधान मोदी एखाद्या नेत्याला आलिंगन देताना तुम्ही पाहिले आहे काय ? क्वचित कधीतरीच असं दृश्य बघायला मिळतं.. मोदी अशी जवळीक कुणाशी साधत नाहीत वा कुणाला साधू देत नाहीत.. मात्र याला एका नावाचा अपवाद आहे.. 'के. अण्णामलाई!' हा माणूस जेव्हा जेव्हा मोदींच्या समोर येतो तेव्हा ते त्याचं स्वागत आलिंगन देऊन करतात.. काय कारण असेल याचं ? मुळात हा 'अण्णा' आहे तरी कोण ?
के. अण्णामलाई.. वय 38. भाजप तामिळनाडूचा अध्यक्ष! पण ही ओळख पुरेशी नाही .. किंबहुना इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अधिक महत्वाचा आणि रोमहर्षक आहे...
'अण्णा'चा जन्म 'करूर' या अती छोट्या खेड्यातला.. आई-वडील गरीब शेतकरी.. आपल्या मुलानं 'कॉलेजचं शिक्षण' घ्यावं ही त्यांची मनीषा! अण्णा 'कॉलेज'मध्ये जाणारा करूरचा पहिलावहिला मुलगा! त्यानं कोईमतूरला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पण 'मोठं पॅकेज' मिळवण्यासाठी आणखी शिकणं आवश्यक होतं. त्याला लखनौच्या IIM मध्ये MBA ला प्रवेश मिळाला... लखनौमधलं आणि एकूणच उत्तर प्रदेशमधलं दारिद्र्य पाहून त्याला धक्का बसला. एकदा त्याला एका टपरीवर फक्त 'पाच रुपयात आठ पुऱ्या' खायला मिळाल्या.. 'पाच रु मिळाले' म्हणून टपरीवाला खूष होता.. हा अण्णा साठी एक 'शॉक' होता. MBA करताना तो पूर्ण यू. पी.फिरला.. विशेषत: पूर्वांचल.. तिथं त्याला असंख्य बालमृत्यू आढळून आले.. तो अतिशय अस्वस्थ झाला.. आणि त्याच सुमारास मुंबईला 26/11 चा हल्ला झाला..आणि अण्णाचं जीवनच बदललं.. *'आपण समाजसेवा- देशसेवा करण्यासाठी सरकारी नोकरी करायची' असं त्यानं ठरवलं..* MBA करता करता त्यानं UPSC ची प्रिलीम दिली.. नंतर मुख्य परीक्षा 'crack' केली.. इंटरव्ह्यू दिला आणि तो IPS उत्तीर्ण झाला.. पोस्टिंग कर्नाटक मध्ये मिळालं..
उडपीमध्ये S.P. असताना त्यानं आपली कारकीर्द गाजवली. तिथल्या कॉलेजात ड्रग माफियांचं जाळं होतं.. ते अण्णानं मोडून काढलं.. स्वतः 'स्पॉट'वर जाऊन तो गुंडांविरोधात कारवाई करत असे.. लोकांनी त्याला *'सिंघम ऑफ उडपी'* ही पदवी दिली.. पण पुन्हा एक 'टर्निंग पॉईंट' आला..
'दहावीत शिकणाऱ्या एका मुलीवर' सामूहिक अत्याचार झाला आणि तिचा खून झाला.. अण्णामलाई त्या स्पॉटवर गेला तेव्हा तिथे दहा हजार लोक जमले होते व दगडफेक चालू होती.. या गुन्ह्यामागच्या कारणांचा त्यानं शोध घेतला.. त्या मुलीच्या शाळेत फक्त दोन कॉम्प्युटर होते.. ते आळीपाळीनं वापरायला मिळत.. त्या दिवशी कॉम्पुटर वापरून शाळेतून बाहेर पडायला त्या मुलीला खूप उशीर झाला.. अंधार पडला होता. तिच्या गावाकडे जायला संध्याकाळी सात नंतर बस नव्हती.. म्हणून ती एकटी चालत जात होती.. आणि हा दुर्दैवी प्रसंग घडला...
'आपण पोलीस नोकरीत राहून या असुविधा (कॉम्पुटर वा बसचा अभाव) दूर करू शकणार नाही' असं अण्णाला वाटू लागलं.. याच दरम्यान 'सरकारी लायझन ऑफिसर' म्हणून त्याला कैलास मानसरोवर यात्रेला जावं लागलं.. तब्बल 70 दिवस.. आणि इथं तो पूर्णपणे बदलून गेला.. 'जीवन बदलणारा निर्णय घेण्यासाठी' आवश्यक असलेली एक 'आध्यत्मिक ऊर्जा' त्याला मिळाली.. त्याचा निर्णय पक्का झाला.. परत येऊन त्यानं नोकरीचा राजीनामा दिला...
*(कदाचित या आध्यत्मिक 'कनेक्ट' मुळे तो मोदींचा लाडका असावा.)* मुख्यमंत्री येडुयेराप्पानी स्वतः विनंती करूनही त्यानं राजीनाम्याचा निर्णय बदलला नाही.. नंतर एक वर्षं त्यानं 'Be the Leaders' हे फौंडेशन चालवलं.. सामान्य तरुणांसाठी..
मग 'दिल्लीतून' कळ फिरली.. भाजपचे काही लोक त्याला भेटले.. त्याला 'convince' केलं.. आणि त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला.. जिथं भाजप हा अत्यंत नगण्य पक्ष आहे तिथं असा निर्णय घेणं हे फारच धाडसाचं काम! मोदी-शहानीही अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्याला तामिळनाडूचा प्रदेशाध्यक्ष केलं... जुलै 2021 मध्ये..
आणि नंतरच्या दीड वर्षात त्यानं तामिळनाडू मध्ये जे लोकप्रियतेचं वादळ निर्माण केलं ते अभूतपूर्व आहे.. महाराष्ट्रात बसून त्याची नेमकी कल्पना येत नाही..
पण सध्या तो एखाद्या सिनेस्टार सारखा लोकप्रिय आहे.. त्याच्या दीड वर्षातील कामगिरी वर स्वतंत्र लेख लिहावा लागेल.. करुणानिधिंच्या गावात जाऊन त्यानं सभा घेतली.. त्याला एक लाख लोक उपस्थित होते.. परवा मोदी चेन्नईला गेले तेव्हाचा रोड शो रेकॉर्ड मोडणारा होता.. *तामिळ तरुणाई सध्या अण्णाच्या प्रचंड प्रेमात आहे..* सध्या तो तिथल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे.. एप्रिल 2023 पासून तो एक वर्षाची पदयात्रा काढणार आहे.. सर्व 234 मतदारसंघातून..
पण तिथलं राजकारण 'क्रूर' मार्गानं जाणारं आहे.. अण्णाला 'संपवण्याचे' प्रयत्न DMK नं हरप्रकारे चालवले आहेत.. जर अण्णामलाई 'सुरक्षित' राहिला तर 2024 चे तामिळनाडूतले निकाल धक्कादायक असतील हे लिहून ठेवा..आणि 2026 च्या विधानसभेचे तर त्याहूनही 'शॉकिंग!'
*'के.अण्णामलाई' हा माझ्या दृष्टीनं 2022 चा 'मॅन ऑफ दि ईयर' आहे...*👍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©️®️धनंजय कुरणे
30/12/22
No comments:
Post a Comment