Saturday, 3 December 2022

मार्गशीर्ष गुरूवार च्या पूजेच्या नारळाचं


*मार्गशीर्ष गुरूवार च्या पूजेच्या नारळाचं तुम्ही काय करता. वाढवता की विसर्जन करता???* 

आम्ही पण प्रसाद करून खायचो पण आज व्हाट्सएपच्या माध्यमातून एक माहिती मिळाली,

|| श्री महालक्ष्म्यै नमः ।।


काही दिवसांपूर्वी एका ज्योतिष विषयक फेसबुक ग्रुपवर एका महिलेने सार्वजनिक स्वरुपात एक प्रश्न विचारला होता....


"मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं?"

यावर उत्तर देताना काहींनी योग्य ते अपेक्षित उत्तर दिलं.


पण काही अतिउत्साही मंडळींनी आपलं मत ठोकलं, की

*त्या नारळाचा प्रसाद करून खावा*.


तर त्याचं थोडक्यात सविस्तर उत्तर आपणास देणं मी माझं कर्तव्य मानतो !!


मुळात नारळ हा केळ किंवा चिकू सारखा सहजपणे खाता येत नाही. नारळावर शस्त्र प्रहार करून वाढवावा लागतो. 

जो नारळ आपण लक्ष्मीमातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून पुजतो, त्या प्रतिकात्मक (पार्थिव) मुखकमलावर शस्त्र प्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेषदायक आहे. 


फक्त मार्गशीर्षातीलच नव्हे, तर इतर कोणत्याही मंगल प्रसंगी, शुभ कार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो. वाढवायचा नसतो.


परंतु काही ठिकाणी जल प्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल, तर तो कलशावर पुजलेला नारळ 3 वेळा पाण्यातून बुडवून तो नारळ मोकळ्या जागेत भूमीत अर्पण करावा (त्यानिमित्ताने वृक्षारोपण होईल). नारळ बुडवलेलं पाणी तुळशीला घालावे.


मुळात कलश पूजन म्हणजे नेमकं काय?

त्याचं स्वरूप काय ते समजून घ्या !


जलयुक्त कलश म्हणजे वरुणादि देवतांचं निवासस्थान !

(फक्त पाण्याचा तांब्या नसतो)


कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित:।

मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता:।।

कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा।

ऋग्वेदोथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथवर्ण:।।

अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिता:।

अत्र गायत्री सावित्री शांतिपृष्टिकरी तथा।

आयांतु मम शांत्यर्थ्य दुरितक्षयकारका:।।

गंगे च यमुनेचैव गोदावरी सरस्वती |

नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरु ||

ॐ कलश देवाय नमः |


हे कलशाचं मूळ स्वरुप आहे.


यासोबत जेव्हा आंब्यांचा डहाळा/ विड्याची पानं व इतर काही वस्तू कलशात घालून वर नारळ ठेवून वस्त्रालंकारांनी सजवतो व संपुर्ण कलशाची पुजा करतो.


तेव्हा त्या संपुर्ण कलशात देवीचं तत्व प्रकट झालेलं असतं. काही पूजांमध्ये कुलस्वामिनी (महिषासूर मर्दिनी/ भगवती/ तुळजाभवानी) म्हणून कलश पुजला जातो. 

तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी (अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी) म्हणून पुजला जातो.


तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पुजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा भूमीत अर्पण करा.

पण कृपा करून वाढवू नका आणि कोंडाळ्यात देखील टाकू नका.


कायम लक्षात ठेवा !!

🙏🙏🙏🙏🙏


लक्ष्मीं क्षीरसमुद्र राजतनयां श्रीरंगधामेश्वरीम् | दासीभूतसमस्त देव वनितां लोकैक दीपांकुराम् || श्रीमन्मन्दकटाक्षलब्ध विभव ब्रह्मेन्द्रगङ्गाधरां |

त्वां त्रैलोक्य कुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियाम् || सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मी सरस्वती | श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा ||


🌸🌸🌸🌸🌸

🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi