Wednesday, 2 November 2022

Punh aप्रपंच* a

 *प्रपंच* करतो *आवडीने*,

*परमार्थ* मात्र *सवडीने*.

नाही *पूजा* नाही *ध्यान*, 

*मोबाईलशी अनुसंधान*


नामस्मरण *boring* फार 

त्याने काय *होणार* यार ?

*देवाने* करावी कृपा *खास* 

*गप्पा* मारतो *तासनतास*


*जप* करतो *माळेवर* 

पण *खरे* प्रेम *पैशावर*

*खिचडीसाठी* करतो *उपास*

*भक्तीमध्ये* पूर्ण *नापास*


*स्वतःच्या* पानात वाटयांची *दाटी*,

*नैवेद्याला* छोटी *वाटी*

*संकट* आल्यावर देव *आठवतो*,

*नवस* बोलून *deal* करतो.


*अभिषेक* मोठ्या *थाटात* करतो, 

*return* वरती *डोळा* असतो.

*सर्व* करतो *स्वतःसाठी*,

पण *देव* हवा *सदा* पाठी.


*देवाकडं* सारख *मागणं*,

*माणसा* तुझं काय हे *वागणं* ?


*शक्ती* दे, *युक्ती* दे, *बुद्धी* दे, 

*विद्या* दे *नोकरी* दे, *घर* दे, 

*बायको* दे, *मुलं* दे *सुख* दे, 

*समाधान* दे, *यश* दे, *कीर्ती* दे 

आणि हे सारं *कायम टिकू* दे,  

*असाही* देवा *वर* दे ! 


*हसून* देव *म्हणतो*,

*माणसा* थकलो तुला *देऊन* सारखा 

*मागण्या* मागतोस फारच *मस्त*,

पण *एवढा* मी नाही *स्वस्त*


*मागून* मागून *थकत* नाहीस 

*थँक्यू* सुद्धा *म्हणत* नाहीस !

*भक्तीमध्ये* करतोस *लबाडी*, 

अरे *चाललीये* कुठे तुझी *गाडी*.


*एवढं* सगळं *द्यायचं* म्हणतोस,

पण *माझ्यासाठी* काय *करतोस*?

*थोडीफार* आठवण *काढून*, 

*मलाच* तुझी *सेवा* सांगतोस.


अरे *एकदा* तरी म्हण *राजा*, 

*देवा* मला *भक्ती* दे.

*मनी* तुझे *प्रेम* दे 

*पायी* तुझ्या *मुक्ती* दे.


तुझे *गीत* गाण्यासाठी 

*कंठामध्ये सूर* दे 

तुझे *रूप* बघण्यासाठी 

डोळ्यांमध्ये *भूक* दे 


तुझा *महिमा* ऐकण्याची 

कानांना या *आस* दे

*तुझे नाम घेण्यासाठी* 

*माझा* *प्रत्येक* *श्वास दे. .!* 


*सुटो* माझी *आसक्ती*,

*लाभो* मला *विरक्ती*.

*अंतकाळ साधण्या इतके* 

*नामामध्ये प्रेम दे*

 

*अंतकाळ साधण्याइतके*

*नामामध्ये प्रेम दे*


*।।रामकृष्ण हरि।।*


🌸🙏🏻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi