Thursday, 1 December 2022

क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन होणार

 क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन होणार

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन.

            मुंबई, दि. 30 : राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणी आता ऑनलाईन होणार असून यासाठी क्रीडा विभागाने विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.


             क्रीडामंत्री श्री. महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी या प्रणालीचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, उपसचिव सुनिल हंजे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व कुस्ती खेळांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त राज्यातील खेळाडूंना क्रीडा विभागामार्फत शासकीय व निमशासकीय सेवेत 5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे, यासाठी खेळांडूची क्रीडा विषयक प्रमाणपत्रे पडताळणी करण्याचे काम क्रीडा विभागामार्फत करण्यात येते. हे पडताळणीसाठी खेळाडूंचा अर्ज, त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र, संघटनांमार्फत त्या-त्या क्रीडा स्पर्धांची विविध आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्यात येत होती. तथापि, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळविणे, तसेच संघटना सचिव यांची बनावट स्वाक्षरी व कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याद्वारे पात्र खेळाडूंच्या बाबतीत अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे क्रीडा विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi