Tuesday, 4 October 2022

बबड काय बोलतेस


 

2 comments:

  1. आज २ ऑक्टोबर. आज पुण्यतिथी आहे एका थोर माणसाची. ह्या माणसाचा जन्म १४ जानेवारी १८९६ चा - महाडजवळ ‘नाते’ गावात - हा माणूस १९१२ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परिक्षेत पहिला आला (तीपण संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती मिळवून!) - पुढे उच्च शिक्षणासाठी हा माणूस शिष्यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेला - १९१५ साली त्याने वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भूगर्भशास्त्र ह्या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याची पदवी पूर्ण केली - १९१८ मध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तो आयसीएस परिक्षेत चक्क पहिला आला - लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे ह्या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे - पण लोकमान्यांनी त्याला सांगितले की ह्या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल - लोकमान्यांची ही विनंती शिरसावंद्य मानून ह्या माणसाने ही सरकारी नोकरी करायचे ठरवले - मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली (ह्या पदांवर काम करणारा हा सर्वात तरूण आयसीएस अधिकारी होता!) - सुमारे २१ वर्ष ह्या माणसाने सरकारी नोकरी केली - १९३१ मध्ये गांधीजींबरोबर गोलमेज परिषदेला हा माणूस सचिव म्हणून गेला होता - १९४१ मध्ये तो रिझर्व्ह बॅंकेचा डेप्युटी गव्हर्नर बनला - ११ ऑगस्ट १९४३ रोजी बॅंकेचा गव्हर्नर जेम्स टेलरच्या मृत्यूनंतर हा माणूस रिझर्व्ह बॅंकेचा सर्वात तरूण आणि पहिला भारतीय गव्हर्नर बनला - दुसऱ्या महायुद्धाचे चटके जागतिक अर्थव्यवस्थेला बसत होते त्यावेळेस ह्या माणसाने योग्य उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला योग्य प्रकारे हाताळले - ह्या कामाबद्दल २१ मार्च १९४४ रोजी ह्याला ब्रिटीश सरकारने ‘सर’ पदवीचा बहुमान दिला - बॅंकेच्या नोकरीत असतानाच भारतीय स्वातंत्र्याच्या संक्रमणकाळात हा माणूस व्हाईसरॉयज कौन्सिलवर वित्तप्रमुख म्हणून नेमला गेला - १९४९ मध्ये ह्या माणसाने बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा इंग्लंडमध्ये जायची तयारी केली होती (कारण १९२० मध्येच त्याने रोझिना विलकॉक्सशी लग्न केले होते आणि त्यांना १९२२ साली मुलगीही झाली होती - तिचं नाव प्रिमरोझ) - पण नेहरूंनी पुन्हा विनंती केल्याने ह्या माणसाने रिझर्व्ह बॅंकेची धुरा पुन्हा सांभाळली - १९५२ साली हा माणूस कुलाबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढला आणि जिंकलाही (कारण तो ‘कॉंग्रेस’चा सदस्य कधीच नव्हता!) - ह्या माणसाला नेहरूंनी अर्थमंत्री बनवलं - भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून नाराज होऊन ह्या माणसाने पुढे राजीनामा दिला - त्यानंतरही ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (युजीसी) चा पहिला अध्यक्ष म्हणून ह्याची नेमणूक झाली - शिक्षणक्षेत्रातही ह्या माणसाने भरपूर योगदान दिलं - आयुष्याच्या उत्तरार्धात हा माणूस हैदराबादला स्थायिक झाला आणि २ ऑक्टोबर १९८२ रोजी ह्याचं निधन झालं - हा माणूस म्हणजे सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख - उपाख्य ‘सीडी’ देशमुख!

    त्यांच्या मृत्यूची फारशी दखलही भारतीय सरकारदरबारी घेतली गेली नाही. इतकी पदं भूषवलेल्या सीडींना साधी सरकारी मानवंदनाही मिळाली नाही. सीडींचे देशप्रेम मात्र निर्विवाद होते. आयुष्यभर देशासाठी ते झटले होते. आपली मूळ पाळंमुळं ते कधीच विसरले नव्हते. ह्याचं उदाहरण म्हणजे - सीडींनी इंग्लंडमध्ये एसेक्स परगण्यामध्ये ‘साऊथऐंड ऑन सी’ गावाजवळच्या ‘वेस्टक्लिफ ऑन सी’ गावात एक टुमदार बंगला बांधला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं ‘रोहा’ - कारण रायगड तालुक्यातलं रोहा हे सीडींचं मूळ गाव! रोह्याचं नाव इंग्लंडमध्ये ठेवणाऱ्या सीडींच्या जन्मगावात - महाडजवळ ‘नाते’ गावात - जिथे सीडींचा जन्म झाला होता - ते घर आजही बंद आणि पडझड झालेल्या अवस्थेत कसंबसं उभं आहे. देशभक्तांची आणि त्यांच्याशी निगडीत वास्तूंची अशी अनास्था करण्याची आपली सवयही तशी जुनीच आहे. हे चालायचंच!

    आज ३९ व्या स्मृतीदिनी सर चिंतामणराव देशमुखांना सादर मानवंदना!

    🌷🙏🙏🙏🌷

    ReplyDelete
  2. महाराष्ट्राला बलशाली करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    विजयादशमी - दसरा सणा निमित्त दिल्या शुभेच्छा

    मुंबई, दि. 4 :- विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पुर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    ‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येवो, त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

    मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, विजयादशमी म्हणजे वाईटावर विजय मिळविल्याचा आनंदोत्सव. कोविडच्या बिकट संकटावर मात केल्यानंतर खऱ्य़ा अर्थानं आपल्या सर्वांसाठी हा आरोग्याचा विजयोत्सवच आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्याला पुढे जायचे आहे. बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रातील प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालावी, अशी आकांक्षा आहे. या विकास पर्वातूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास आहे. या ध्यासपूर्तीसाठी आपण एकजुट करूया या आवाहनासह पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमी – दसरा सणाच्या मनापासून शुभेच्छा.!

    0000

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi