विजया दशमीनिमित्त
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 4: विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमीच्या पावनपर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, विजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचा, मांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावनपर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.
००००
No comments:
Post a Comment