Sunday, 9 October 2022

जगी रे

 विझवून आज रात्री 

कृत्रिम दीप सारे

गगनात हासणारा 

तो चंद्रमा पहा रे


असतो नभात रोज 

तो एकटाच रात्री 

पण आजच्या निशेला 

त्याच्या सवे रहा रे


चषकातुनी दुधाच्या 

प्रतिबिंब गोड त्याचे

पाहून साजरी ही 

कोजागिरी करा रे


*कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi