Monday, 17 October 2022

चर्नी रोड स्थानक पुल दुरुस्तीपर्यंत

 चर्नी रोड स्थानक पुल दुरुस्तीपर्यंत

तात्पुरती तिकीट खिडकी तातडीने सुरु करावी

- पालकमंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि.14 :- चर्नी रोड स्थानकाच्या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती तिकीट खिडकी तातडीने सुरु करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

            चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाच्या दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची नुकतीच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

             यावेळी आमदार रईस शेख, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त परिमंडळ डॉ. संगिता हसनाळे, बृहन्मुंबई महानगरपालिकाचे उपायुक्त (पायाभुत सुविधा) संजय महाले, मंडळ रेल्वे प्रबंधक (वेस्टन रेल्वे) मुंबई आवधिश वर्मा यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, रेल्वे विभागाला टिकीट खिडकी सुरु करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. चर्नी रोड स्थानकातील उत्तर बाजूचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर उतरणारा पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. येथे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी तात्पुरती तिकीट खिडकी सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi