Monday, 10 October 2022

मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली


            मुंबईदि. 10 : 'देशाच्या राजकारणसमाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले’अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापकउत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            'मुलायमसिंह यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील आणि वैशिष्ट्यपूर्ण राहीली आहे. पक्षाची स्थापनासंघटन बांधणी ते देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्यांनी धुरंधर आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली. त्यांचे देशाच्या समाजकारणराजकारणाच्या वाटचालीतील योगदान सदैव स्मरणात राहील.असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi