विदर्भ, मराठवाडा, उर्वरीत महाराष्ट्र विकास मंडळे पुनर्गठीत करण्यास मंजूरी
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याच्या निर्णयास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या विकास मंडळांना वैधानिक विकास मंडळे असे संबोधण्याचा देखील निर्णय झाला.
या तीनही मंडळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आला आहे. आता पुनर्गठनाबाबतचा प्रस्ताव पाठवतांना तो राज्यपालांमार्फत केंद्र सरकारला पाठवण्यात येईल. यापूर्वी विकास मंडळांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment