Saturday, 1 October 2022

मी पैसा बोलतोय..."*

 *खूपच छान आहे,, सर्वांनी वाचावे,,*👌👌

*"मी पैसा बोलतोय..."*

मित्रहो... सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो, 

मी आहे पैसा... माझं रूप तसं साधारणच आहे, पण संपुर्ण जगाला चालवायची व व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे...

मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे, कारण मनुष्य मला आदर्श समजतो...

अहो... काही लोक तर माझ्यासाठी आपली जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, माझ्यासाठी आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात...

 अहो... एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह ही विकतात...

पण लक्षात ठेवा... मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही...

 परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात...

मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी राक्षस बनतात, अपराध करतात...

हे सत्य आहे कि मी देव नाही, पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात...

खरं तर, मी लोकांच्या सेवेसाठी आहे, पण लोकंच माझे गुलाम झाले आहेत...

मी कधी कुणासाठी त्याग नाही केला, पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात...

मला तुम्हाला काही अतिशय महत्वाच्या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत, सांगायच्या आहेत...

मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो...

मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......

*... पण तुमच्या घराला घरपण नाही आणू शकत.*


मी तुमच्यासाठी औषधं आणू शकतो ......

*...पण तुम्हाला निरोगी आयुष्य नाही देवू शकत.*

मी तुमच्यासाठी महागडे घड्याळ विकत घेऊ शकतो...

*...पण वाया गेलेला अमुल्य वेळ, सुखाचे क्षण नाही आणू शकत.*

मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो...

*...पण आदर नाही घेऊ शकत.*

मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो...

*...पण शांत झोप नाही घेऊ शकत.*

मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो...

*...पण विद्या व सुविचार आचरणात नाही आणू शकत.*

मी तुमच्यासाठी रक्त ही विकत घेऊ शकतो...

*...पण जात असलेला जीव नाही वाचवू शकत.*

म्हणून सदैव लक्षात ठेवा...

*पैसा हेच सर्वस्व नाही...*

*पैसा जरुर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर व बहुमुल्य सुखाचे क्षण गमावू नका...*

*पैश्यांची पूजा जरूर करा, पण पैश्याचे गुलाम बनू नका...*

*माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही...*

*आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ट हेच आपली खरी धनदौलत आहे, त्यांचा नेहमी आदर करा...*

*त्यांना जिवापाड जपा, कारण जेव्हा तुम्हाला देवाचं बोलावणं येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत, पुढचं सगळं काम तेच करतील... मी नाही करणार...*

*तुम्ही केलेले परोपकार, दुसऱ्यांना दिलेला आनंद, माता पित्यांची भक्ती, त्यांची केलेली सेवा, देशसेवा व समाजसेवा... हेच तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना करा...*

*मग आयुष्यात तुमच्यासारखे सुखी, समाधानी व धनी... कोणीही नसणार...!!*


                    धन्यवाद....!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi