Thursday, 29 September 2022

दिलखुलास

 दिलखुलास' कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे

मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांची मुलाखत

 

           मुंबई, दि. 29: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त (अ.का.) दिलीप शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शुक्रवार  दि. 30 सप्टेंबर आणि शनिवार दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

             ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ आणि सेवा पंधरवडा याविषयी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतीमान, कालबद्ध सेवा देण्यासाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ पारित करण्यात आला आहे. नागरिकांना अधिकार देणारा आणि प्रशासनाला उत्तरदायी करणारा हा क्रांतिकारी कायदा आहे, असे  मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi