Thursday, 25 August 2022

शिक्षक deeeeeeeen

 *शिक्षक कुठे काय करतो*


वकील, डॉक्टर, आणि कलेक्टर

सारं तुम्हास करण्या जीव त्याचा झुरतो

तरी,कुणीही उठतं शेमडं बंब आजकल

म्हणे शिक्षक कुठे काय करतो

वेळ जनगणनेची आली

त्यांनी अशी तयारी केली

दिसभर विद्यादान करी

रात्री जनगणना सुरू झाली

वेळ मिळेना देण्या कुटुंबाला

सर्व्हे करण्या दारोदारी फिरतो

तरी कुणीही उठतं.....।।

निवडणुकीची आली वारी

सारे शिक्षक बनले अधिकारी

कुटुंबाची त्यास नाही पर्वा

राष्ट्रीय कार्य जोमाने करी

निष्पक्षपाती,इमानदार तो

साऱ्यांस असा आदर्श तो ठरतो

तरी कुणीही उठतं.......

सर्व्हेक्षण साऱ्या गावाचे करी

पोलिओ डोस पाजले दारोदारी

असा अष्टपैलू आहे का कुणी

कामे एकटाच सगळे करी

डोईवरी बोजा अशैक्षणिक कामाचा

विद्यादान तरीही इमाने करतो

तरी कुणीही उठतं.......

कोरोना संकट आले देशावरी

इथेही जोमाने तो देशकार्य करी

कोवीड-१९ योध्दा बनला असा

राष्ट्रीय कार्य सदैव उरी

सेवा देताना कैक बळीही गेले

तो ही देशासाठी शहीद इथे ठरतो

तरी कुणीही उठतं........

पोतं पोषण आहाराचे डोईवरी

कारकून-शिपायांचंही काम तो करी

कुटुंबकल्याणाच्या केसही केल्या

कधी प्रौढ शिक्षणाचीही ओढली दोरी

प्रामाणिकपणे हे सारे करण्या

धावपळ करून एकटाच मरतो

तरी,कुणीही उठतं शेमडं बंब आजकल

म्हणे शिक्षक कुठे काय करतो 


*श्री. सुभाष बाबू ओव्हाळ*

*माणगांव, रायगड.*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi